खामेनेईंच्या हत्येनंतर इराणचा ‘रिव्हेंज मोड’ ऑन!

इराणचा अमेरिका-इस्रायलला इशारा, अन्त्यसंस्कारानंतर प्रत्युत्तर देणार

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
तेहरान,
irans warning to the us and israel इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख मेजर जनरल अमीर हातामी यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला. खामेनेई यांच्या अन्त्यसंस्कारानंतर जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
Khamenei
 
इराणी जनतेच्या शत्रूंना अमेरिका आणि गुन्हेगार झायनिस्ट राजवटीला सांगू इच्छितो की, आम्ही शहीद नेत्याच्या रक्ताचा बदला घेऊ, असे हातामी यांनी अन्त्यसंस्कारावेळी पत्रकारांशी बोलताना म्हटले. आमच्या नेत्यांच्या हत्येचा सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. खामेनेई यांच्या हत्येची मोठी किंमत शत्रूला चुकवावी लागेल.
 
दरम्यान, खामेनेई यांच्या अन्त्यसंस्काराची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, ९ जुलैपर्यंत अन्त्यसंस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी, अनेक राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, वरिष्ठ मंत्री आणि धार्मिक नेते तेहरानमध्ये दाखल झाले. सुमारे दीड ते दोन कोटी नागरिक अन्त्यदर्शन आणि अन्त्ययात्रेत सहभागी होतील, असा अंदाज इराणी प्रशासनाने व्यक्त केला.
  
श्रद्धांजली कार्यक्रमाला प्रारंभ
शुक्रवारपासून तेहरानमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घालीबाफ, न्यायव्यवस्था आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यांनी खामेनी यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली. काळ्या पगडीने सजवलेल्या शवपेटीपाशी राष्ट्राध्यक्षांनी प्रार्थना केली. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्पचे (आयआरजीसी) प्रमुख अहमद वहिदी यांनीही युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या हजेरी लावत खामेनी यांना श्रद्धांजली वाहिली.
  
हल्ल्याच्या स्थळी पार्थिव नेले
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनी यांचे पार्थिव तेहरानमधील त्यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणी नेण्यात आले. हा कार्यक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता पार पडला. त्यानंतर शासकीय इतमामात होणाऱ्या अन्त्यसंस्काराच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले.