'हिट अँड रनचा थरार डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
मुंबई
jogeshwari hit and run मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोगेश्वरी पश्चिम भागात भरधाव वेगाने आलेल्या टँकरने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुण डिलिव्हरी बॉयचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 

jogeshwari hit and run accident delivery boy killed tanker accident mumbai news 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव हर्ष असे आहे. हर्ष हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि नेहमीप्रमाणे तो रात्रीच्या वेळी आपल्या कामावर होता. या दरम्यान जोगेश्वरी पश्चिम येथील अमृत नगर परिसरातील अजित ग्लास गार्डन गेटसमोरून तो जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की हर्षचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात करणारा टँकर चालक हा दारूच्या नशेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपघातानंतर घाबरलेला चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र परिसरातील jogeshwari hit and run  नागरिकांनी सतर्कता दाखवत त्याला पळण्यापूर्वीच पकडले.या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून वाढत्या अपघातांमुळे आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.