डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर नचिकेत दांडेकर

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
विवेकानंद विद्यालयात सन्मानित

यवतमाळ, 
Nachiket Dandekar येथील विशुद्ध विद्यालयद्वारा संचालित विवेकानंद विद्यालयाचा माजी विद्यार्थी, डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर नचिकेत दांडेकर यास विशेष कामगिरीबद्दल विद्यालयात सन्मानित करण्यात आले. नरसापूरच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचा विक्रमी वेळात तपास पूर्ण होऊन अपराध्यास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 1 मे रोजी ही अमानुष घटना घडल्यानंतर गुन्हेगारांस गजाआड करणे, पुरावे गोळा करून ते न्यायालयात टिकतील याची दक्षता घेणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांचे मार्गदर्शन व तपास अधिकारी विजयमाला पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने मोठेच कार्य पार पाडले.
 
 
nachiket
 
या कामी त्यांना सना सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन अँड डेटा सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या नचिकेत दांडेकर आणि त्यांच्या चमूचे उत्तम तांत्रिक सहाय्य मिळाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करताना सीसीटीव्ही फूटेज, न्यायवैद्यक पुरावे, सायबर तपास अशी अनेक आव्हाने होती. त्यासाठी पोलिसांना दांडेकर आणि चमूने आवश्यक मदत केली.
 
 
महाराष्ट्रभर खळबळ उडवणाèया या संतापजनक प्रकरणात आरोपीस 59 दिवसांत फाशी सुनावण्यापर्यंत पोलिसांसोबतच नचिकेत दांडेकर आणि चमूला दिवसरात्र परिश्रम घ्यावे लागले. या कामी यश प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनीही या चमूचे विशेष अभिनंदन केले.
नचिकेत दांडेकरने यापूर्वीही महाराष्ट्र व देशभरातील विविध तपास यंत्रणांना सायबर क्राईम, डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन इत्यादींमध्ये सहकार्य केले आहे. त्याबद्दल त्यास आतापर्यंत प्रगत भारत पुरस्कार, डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार व डिजिटल हिरो अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. या विशेष क्षेत्रातील कामगिरीबद्दल विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांपुढे या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून नचिकेतचा मुख्याध्यापक विवेक अलोणी व पर्यवेक्षक विवेक कवठेकर यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी नचिकेतची आई भाग्यश्री बापट दांडेकर व व्यंकटेश विद्यालयाच्या मुख्याध्यापक स्वाती जोशी यांच्यासह विवेकानंद विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.