प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी युवकाने विकत घेतली पिस्तूल

पोलिसांनी पाच काडतूसह केली अटक

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime ‘प्रेमासाठी वाट्टेल ते...’ करण्याची ओढ एका प्रियकराच्या चांगलीच अंगलट आली. युवकाने प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी एका कुख्यात गुन्हेगाराकडून पिस्तूल विकत घेतली. प्रेयसी भेटायला आल्यानंतर त्याने प्रेयसीला पिस्टल दाखवली. मात्र, तीच खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या युवकाच्या घरात छापा घालून पाच काडतूस आणि पिस्तूल ताब्यात घेऊन युवकाला अटक केली. प्रेम सिंग असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 
 
 

prince buys pistol to impress girlfriend, arrested with gun and live cartridges in nagpur crime
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम सिंग याचे एका युवतीवर प्रेम आहे. तो तिच्या प्रेमात ठार वेडा झाला आहे. त्यामुळे तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असायचा. त्याने प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी पिस्तूल आणि काडतूस आणण्याचे ठरविले. त्याने शहरातील कुख्यात गुन्हेगार राहुल राजेंद्र ठाकरे (नंदनवन) याची भेट घेतली. राहुल हा नुकताच कारागृहातून एका हत्याकांडाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला आहे. त्याला एका पिस्तुलाची मागणी केली. त्याने ७५ हजार रुपये किंमत सांगितली आणि ८ दिवसांत पिस्तूल देण्याचे आश्वासन दिले. प्रेमने पैशाची व्यवस्था केली आणि राहुलला फोन केला. त्याने ५ काडतूस आणि पिस्तूल त्याला दिले. पिस्तूल घेऊन तो घरी आला. त्याने दुसऱ्या दिवशी प्रेयसीला ‘सरप्राईज’ देण्यासाठी बोलावले. दोघांची भेट झाली. तिला लगेच पाठीमागे लपवलेली पिस्तूल दाखवली. प्रेयसी खुश झाली पण ते चित्र काही जणांनी बघितले. त्यांनी लगेच पोलिसांना खबर दिली.
 
पिस्तूल घरातून जप्त
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख दर्शन पाटील यांनी आरोपी प्रेम सिंग याच्या घरावर छापा घातला. या छाप्यात पिस्तूल, काडतूससह आणखी एक तलवार मिळून आली. ही पिस्तूल राहुल ठाकरे कडून विकत घेतल्याची कबुली आरोपीने दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल, पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, हवालदार प्रकाश माथनकर, लक्ष्मण चवरे, किशोर ठाकरे, नितीन वासवे, कमलेश क्षिरसागर आणि पूनम यांनी केले.