संभाव्य दुष्काळाबाबत सतर्क रहा

केंद्रीय गृहमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी घेतला आढावा

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
potential drought जून महिन्यात देशाच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि संभाव्य दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान शाह यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना सतर्क राहण्याचे आणि खरीप पिकांच्या पेरणीबाबत शेतकऱ्यांना वेळेवर व अचूक सल्ला देण्यासाठी राज्य सरकारांशी उत्तम समन्वय साधण्याचा निर्देश दिला.
 
 
amit-shah
 
एका अधिकृत निवेदनानुसार, या बैठकीत शेतकऱ्यांना पुरेशी वीजपुरवठा करणे, सर्व जलाशयांमधील पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे आणि जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. जून महिन्यात देशात सामान्यपेक्षा सुमारे ४० टक्के कमी पावसाची नोंद झाली. सर्वांत मोठा परिणाम मध्य भारतात दिसून आला, जिथे पावसात ५०.४ टक्क्यांनी घट झाली.
 
खरीप पेरणीचे क्षेत्र २३ टक्क्यांनी कमी
कमी पावसामुळे यंदा खरीप पिकांच्या पेरणीवरही परिणाम झाला. २५ जूनपर्यंत खरीप पिकांखालील क्षेत्र २३ टक्क्यांनी कमी होऊन १८२.७२ लाख हेक्टरवर आले. या बैठकीदरम्यान अमित शाह म्हणाले, आम्ही अल निनोमुळे देशाच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत, अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांशी समन्वय साधून शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीला अनुकूल पिके पेरण्याचा सल्ला द्यावा, असा निर्देशही त्यांनी दिला.
 
अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक ती पावले उचला
शाह पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील सर्व जलाशयांच्या पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवावे़ चारा, भरडधान्ये आणि कडधान्ये यांसारख्या कमी पाणी लागणाऱ्या पर्यायी पिकांना प्रोत्साहन द्यावे़, यावर भर देत त्यांनी ऊर्जा सचिवांना शेतकरी आणि सामान्य ग्राहकांना अखंडित व पुरेसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावेत, असा निर्देश दिला.