वर्धा
student welcome संस्कार आणि संस्कृतीची जडणघडण करण्यासाठी ओळखल्या जाणार्या सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल पवनार येथे नवीन सत्राचा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्याथ्र्यांनी शाळेच्या पायरीला नमन करीत प्रवेश केला.
student welcome नवसत्राच्या शुभारंभाचे आगळेवेगळे स्वागत करण्यासाठी शाळा फुगे आणि फुलांनी सजवण्यात आली होती. विद्यार्थिनी वेगवेगळ्या वेशभूषेत आल्या होत्या. सरस्वती पूजन दीपमंत्र व वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली.
student welcome विद्याथ्र्यांना औक्षण करून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पायरीला नमस्कार करून त्यांचा वर्गात प्रवेश घेण्यात आला. नवीन विद्याथ्र्यांचा परिचय सोहळा घेण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव संजय जलताडे, कोषाध्यक्ष मदन परसोडकर, मुख्याध्यापक विद्या उमाठे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.