तेहरान,
Tehran grief for Khamenei इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीला शनिवारी राजधानी तेहरानमध्ये सुरुवात झाली. या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड जनसमुदाय जमला असून, १ कोटींहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतासह १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी या सोहळ्यासाठी तेहरानमध्ये दाखल झाले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हवाई हल्ल्यात ८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण इराणमध्ये शोककळा पसरली आहे. खामेनेई यांचे पार्थिव तेहरानमधील ग्रँड मसल्ला येथे काचेच्या शवपेटीत ठेवण्यात आले आहे. अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. अनेकजण अश्रूंनी निरोप देताना दिसले, तर काहींनी “आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सूड घेऊ” अशा घोषणा दिल्या. अनेक शोककर्ते हातात बॅनर आणि झेंडे घेऊन सहभागी झाले होते. तेहरान शहरभर खामेनेई यांच्या छायाचित्रांचे मोठे फलक लावण्यात आले आहेत.शिया परंपरेनुसार अनेकांनी छाती बडवत शोक व्यक्त केला.
ग्रँड मसल्ला येथील मंच पूर्वी खामेनेई ज्या ठिकाणी भाषणे देत असत, त्याच धर्तीवर उभारण्यात आला आहे. त्यांच्या शवपेटीवर प्रेषित मुहम्मद यांच्या वंशाचे प्रतीक मानली जाणारी काळी पगडी ठेवण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या शवपेट्याही तिथे ठेवण्यात आल्या आहेत.इराण सरकारच्या मते, १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनेई यांच्या अंत्यविधीनंतरची ही सर्वात मोठी गर्दी ठरत आहे. त्यावेळी जवळपास १ कोटी लोक सहभागी झाले होते. मात्र, त्या वेळी चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला होता. उष्णतेचा विचार करून आयोजकांनी गर्दीवर पाणी शिंपडण्याची आणि थंड पेयांची व्यवस्था केली आहे. तब्रीझहून सुमारे ५३० किलोमीटर प्रवास करून आलेले अली काझेमी हे देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.भारताकडून बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी अंत्यविधीला हजेरी लावली. सय्यद अता हसनैन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारताच्या वतीने उपस्थिती नोंदवल्याचे सांगितले आणि संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. दरम्यान, दक्षिण डकोटा येथील माउंट रशमोर येथे भाषण करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविषयी वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, “आम्ही इराणला मोठे नुकसान पोहोचवले आहे. त्यांना करार करायचा आहे. आम्ही त्यांना अंत्यविधीसाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे.