मंदिराची जमीन दिली मुस्लिम समुदायाला

ब्रिटनच्या स्थानिक प्रशासनाचा निर्णय, मूर्ती हटवल्या, हिंदू समुदाय संतप्त

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
लंडन,
muslim community तत्कालीन प्रशासनाने हिंदू समुदायाला प्रार्थना केंद्र आणि मंदिर बांधकामासाठी दिलेली जमीन मुस्लिमांना देण्याचा संतापजनक निर्णय ब्रिटनच्या दक्षिण केंब्रिजशायर प्रशासनाने घेतला. निर्णयानंतर तत्काळ हिंदू समुदायाला जमीन खाली करण्याचा आदेश देण्यात आला, विशेष म्हणजे हिंदू नागरिकांनी स्थापित केलेल्या मूर्ती प्रशासनाने हटवल्या आणि एका गॅरेजच्या परिसरात उघड्यावर ठेवल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
 
 
muslim community
 
केंब्रिजशायरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या हिंदू नागरिकांना प्रार्थनास्थळ बांधण्यासाठी तत्कालीन प्रशासनाने ०.२ हेक्टर सरकारी जमीन ९९९ वर्षांसाठी अत्यंत नाममात्र भाडे आकारून भाडेपट्ट्यावर दिली होती. या भागात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डाव्यांची सत्ता आली. हिंदू समुदायाला देण्यात आलेल्या जमिनीसाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी नव्याने बोली लावण्याचा निर्णय घेतला. नॉर्थस्टोच्या हिंदू समाजानेही या जमिनीसाठी बोली लावली. त्यांनी या जमिनीवर एक मंदिर, विविध धर्मांच्या लोकांसाठी एक केंद्र आणि एक आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला होता. तथापि, बोलींचे मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हिंदू समुदायाचा प्रस्ताव नाकारत मुस्लिमांसाठी ही जमीन राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. धार्मिक कार्यांसाठी हिंदू धर्मादाय संस्थेला जमीन देण्याऐवजी, स्थानिक परिषदेने ती मुस्लिम गटाला दिली. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या बारा तासांंतच हिंदू समुदायाला जमीन खाली करण्याचा आदेश दिला. त्यांनी या जागेवर स्थापित केलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती देखील हटवण्यात आल्या. प्रशासनाच्या कृत्यामुळे ब्रिटनमधील हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
केंब्रिजशायरमध्ये एकही मंदिर नाही
केंब्रिजशायरमध्ये अनेक चर्च आणि मशिदी आहेत, पण एकही मंदिर नाही. हिंदूंना उपासनेसाठी बर्मिंगहॅम किंवा वेंबली येथे दोन तासांचा प्रवास करावा लागतो. जमिनीचे भाव आवाक्याबाहेर असल्याचे ते सामुदायिक जागा भाड्याने घेऊ शकत नाहीत. ब्रिटनमधील हिंदू संघटना एचएसएनच्या अध्यक्षा अपर्णा सक्सेना म्हणाल्या, स्थानिक प्रशासनाने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. जमीन वाटपाची प्रक्रिया पारदर्शक नव्हती.
सण, उत्सव साजरा करण्याची चिंता
प्रशासनाच्या निर्णयाचा केंब्रिजशायर आणि नॉर्थस्टोमध्ये राहणाऱ्या १५० हिंदू कुटुंबांनी तीव्र निषेध केला. अपर्णा सक्सेना यांनी सांगितले की, येथील नागरिकांना सण, उत्सव साजरे करण्याची चिंता आहे. महाशिवरात्री, जन्माष्टमी आणि अनेक सण आम्ही हिंदू प्रार्थनास्थळी साजरे करीत असे. मात्र, आता ते शक्य होणार नाही. उत्तरप्रदेशातील कानपूरहून आलेले अभिषेक श्रीवास्तव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, कधीकधी यूकेला येऊन आपण चूक केली असे वाटते. हिंदूंचे एकही मंदिर या भागात नाही.