शेतकर्‍याचा बळी घेणारा ‘टस्कर’ अखेर गडचिरोलीकडे रवाना

वनविभागाची माहिती

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
सावली
elephant news संपूर्ण सावली तालुक्यासह परिसरात महिन्याभर दहशत निर्माण करणारा आणि एका शेतकर्‍याचा बळी घेणारा टस्कर हत्ती कळपासह अखेर जंगलमार्गे गडचिरोली जिल्ह्यात परतल्याने वनविभागासह येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
 
elephant
 
elephant news  वनविभागाच्या माहितीनुसार, 3 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास हा टस्कर हत्ती सामदा-सोनापूर मार्गे जंगलातून गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परत गेला. मात्र, तो पुन्हा सावली वनपरिक्षेत्रात येऊ नये यासाठी वनविभागाने कोणतीही जोखीम न पत्करता सामदा-सोनापूर मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, एक ड्रोन आणि तब्बल 50 कर्मचारी सतत गस्त घालत आहेत.
 
elephant news  हत्तींचा कळप पाहण्यासाठी विविध गावांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वनविभागासमोर आणखी मोठे आव्हान निर्माण झाले होते. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी धान पेरणीच्या कामात व्यस्त झाले असताना हत्तींच्या धुमाकूळीने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांना अखेर यश आले असून, हत्तींचा कळप आणि संबंधित टस्कर गडचिरोलीच्या जंगलात परतला आहे. मात्र, संभाव्य धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने वनविभागाने सामदा-सोनापूर मार्गावर विशेष गस्त सुरूच ठेवली आहे, तसेच कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.