आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अडकले विवाहबंधनात

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
मुंबई
aamir khan marriage  बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी गौरी स्प्रॅट यांच्यासोबत अखेर विवाहबंधनात अडकत 5 जुलै रोजी मुंबईतील पाली हिल येथील आपल्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात विवाह सोहळा पार पडला. हा विवाह स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आला असून या खास प्रसंगी केवळ कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते.
 

aamir khan marriage 
अभिनेता आमिर खान यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या विवाहाबाबत माहिती देताना मोठा समारंभ टाळून घरगुती पद्धतीने नोंदणीकृत विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी आकर्षक रोषणाई करून विवाहासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती.
या विवाह सोहळ्याला सुमारे 100 ते 150 निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. समारंभ अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असला तरी अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.या विशेष क्षणी आमिर खान यांची मुलगी आयरा खान आपल्या पतीसह aamir khan marriage उपस्थित होती, तर मुलगा जुनैद खान देखील वडिलांच्या या आनंदाच्या प्रसंगाचा साक्षीदार ठरला. याशिवाय आमिर खान यांच्या बहिणीसह इतर जवळचे नातेवाईकही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते.मुंबईत मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टची परिस्थिती असतानाही विवाहाच्या तयारीत कोणताही अडथळा आला नाही. विवाहाच्या पूर्वसंध्येला घराबाहेर फर्निचर आणि खुर्च्या आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटोही समोर आले होते, ज्यामुळे खराब हवामान असूनही सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पडल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, गौरी स्प्रॅट यांच्याशी झालेला हा आमिर खान यांचा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्यांनी 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दांपत्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. सुमारे 16 वर्षांच्या संसारानंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.त्यानंतर ‘लगान’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमिर खान यांची ओळख किरण राव यांच्याशी झाली आणि दोघांनी 2005 मध्ये विवाह केला. या नात्यातून त्यांना आझाद हा मुलगा झाला. मात्र 2021 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतरही आमिर खान यांचे त्यांच्या दोन्ही माजी पत्नी—रीना दत्ता आणि किरण राव—यांच्यासोबत मैत्रीपूर्ण आणि परस्पर आदराचे संबंध कायम असून, अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.