जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप आमदारांचे वर्चस्व, बाजी मारली कुणी?

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
aurangabad district bank election result छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले होते. निवडणुकीचा निकाल सकाळीच समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. या निकालानंतर संचालक मंडळात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची एंट्री झाल्याने बँकेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
 

aurangabad district bank election result, 
या निवडणुकीत महायुतीने 20 जागांपैकी 7 संचालक अगोदरच बिनविरोध निवडून आणत आपली ताकद दाखवली होती. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. आज जाहीर झालेल्या निकालानंतर संचालक मंडळात मंत्री, खासदार आणि आमदारांचे स्पष्ट वर्चस्व दिसून आले आहे.
निवडून आलेल्या व बिनविरोध aurangabad district bank election result ठरलेल्या सदस्यांमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट बिनविरोध निवडून आले आहेत. कॅबिनेट मंत्री अतुल सावे विजयी झाले आहेत. आमदार रमेश बोरनारे आणि आमदार विलास भुमरे हेही बिनविरोध निवडले गेले आहेत. आमदार अंबादास दानवे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव तसेच खासदार डॉ. कल्याण काळे हे विजयी झाले आहेत.संचालक मंडळात एकूण 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार आणि 5 आमदारांची निवड झाल्याने हे मंडळ चर्चेत आले आहे. जिल्हा बँकेचे हे ‘हेवीवेट’ संचालक मंडळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.निवडणूक प्रक्रिया 4 जुलै रोजी पार पडली होती, ज्यात 1053 पैकी 1048 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल 99 टक्के मतदानाची नोंद झाल्याने निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आणि चुरस दिसून आली. मतदानानंतर आज सकाळपासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली.याआधीच महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे 7 संचालक बिनविरोध निवडून आले होते, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या महाविकास आघाडीच्या भूमिपूत्र शेतकरी बचाव पॅनलचा एक संचालक बिनविरोध निवडून आला होता. अशा प्रकारे एकूण 8 संचालक मतदानापूर्वीच बिनविरोध झाले होते.उर्वरित 12 जागांसाठी मतदान झाले, ज्यात गंगापूर, सोयगाव, कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर या चार तालुक्यांतील चार जागा, बिगर शेती मतदारसंघातील पाच जागा, दोन महिला जागा आणि इतर मागासवर्गातील एक जागा यांचा समावेश होता. या निवडणुकीत एकूण 31 उमेदवार रिंगणात होते.निकालानंतर जिल्हा बँकेचे नवे संचालक मंडळ पूर्णपणे दिग्गजांच्या प्रभावाखाली आले असून, या निकालाने जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना नवे परिमाण मिळाले आहे.