सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा
चांदूर बाजार,
Bachchu Kadu गेल्या २५ वर्षांमध्ये सेवेच्या आधारे मी चारवेळा आमदार झालो. सामाजिक सेवा आणि आरोग्य सेवा आम्ही निरंतर करत राहिलो. विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा , ग्रामपंचायत संगणक कर्मचाऱ्यांचा प्रश्न ताकदीने मांडून मंजुरी मिळवून घेतली. दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर व गोरगरिबांसाठी नेहमीच आवाज उठवत राहू, अशी ग्वाही विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी दिली.
येथील लंगोटे पॅलेसमध्ये त्यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. यावेळी ते बोलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदूर बाजार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मनीषा मनीष नांगलिया होत्या. वाढदिवासानिमित्त आयाेजित कार्यक्रमांमध्ये आरोग्य शिबिर, गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर, तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिर घेण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रहार संघटना व नगर परिषद चांदूर बाजार यांनी केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.