मुंबई
bank holidays पुढील आठवड्यात, म्हणजेच 6 ते 12 जुलै या कालावधीत देशातील बँक व्यवहारांचे नियोजन करताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण या कालावधीत शनिवार आणि रविवार असल्याने सर्वच बँका देशभरात बंद राहणार आहेत. याशिवाय उरलेल्या कार्यदिवसांमध्ये विविध राज्यांतील स्थानिक सण व विशेष प्रसंगांमुळे काही ठिकाणी बँकिंग सेवा उपलब्ध नसेल.
9 जुलै रोजी शिलाँग येथे बेह डेंखलाम या सणानिमित्त बँका बंद राहणार आहेत. तसेच 6 जुलै रोजी मिझोरमची राजधानी आईजोल येथे एमएचआयपी डे निमित्त बँकांना सुट्टी असेल. त्याच दिवशी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीमुळे बँक व्यवहार बंद bank holidays राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, या सर्व स्थानिक सुट्ट्या संबंधित भागापुरत्याच मर्यादित असतील आणि इतर ठिकाणी बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी प्रत्यक्ष बँक शाखा बंद राहतील, तेथे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहणार असल्यामुळे ग्राहकांना डिजिटल माध्यमातून आपली कामे करता येतील.स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या भागांत बँका बंद राहण्याची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी आपले आर्थिक व्यवहार आधीच नियोजित करावेत. मात्र, या आठवड्यात फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच देशभरातील सर्व बँका बंद राहतील, त्यामुळे गोंधळ टाळावा, असेही सूचित करण्यात आले आहे.