शेतकर्‍यांच्या शाश्वत उत्थानासाठी देशी गोवंशाचे संवर्धन काळाची गरज : आ.बाबूसिंग महाराज

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
मानोरा,
desi cow conservation संकटग्रस्त शेतकर्‍यांचा उद्धार केवळ देशी गाई - गुरांच्या माध्यमातूनच होणे शय आहे. रासायनिक शेतीने जमीन नापीक झाली, खर्च वाढला. देशी गाईचे शेण, गोमूत्र यावर आधारित नैसर्गिक शेतीच शेतकर्‍यांना कर्जमुक्त व समृद्ध करू शकते, असे प्रतिपादन धर्मगुरु तथा आमदार बाबूसिंग महाराज राठोड यांनी केले.
 

desi cow conservation 
राज्य गोमाता आयोग तथा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली राज्यमाता गोमाता संवाद यात्रा २०२६ वाशीम जिल्ह्यासह विदर्भात दाखल झाली आहे. वाशीम सह यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात या यात्रेचे व राज्य गोमाता आयोगाच्या अध्यक्ष शेखर मुंदडा यांचे स्वागत आ. बाबूसिंग महाराज राठोड यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. आ. महाराज म्हणाले, आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. कारण उत्पादन खर्च वाढला, पण उत्पन्न घटले. रासायनिक खते, कीटकनाशके यांनी जमिनीचा पोत बिघडवला. यावर एकच उपाय - देशी गोवंश. एका देशी गाईपासून ३० एकर शेतीसाठी नैसर्गिक खत व जंतुनाशक तयार होते. बैलजोडीमुळे नांगरणीचा खर्च वाचतो. गो-आधारित शेतीमुळेच शेतीचा उत्पादन खर्च शून्यावर आणणे शय आहे. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती केली, पण आता गो-आधारित अर्थक्रांती ची गरज आहे. शासनाने प्रत्येक शेतकर्‍याच्या गोठ्यात देशी गाय पोहोचवावी. गोशाळांसह गोपालन वाढवावे. देशी गाईला राज्यमाता दर्जा दिला आहे, आता तिला अर्थमाता बनवूया, असे आवाहन त्यांनी केले.
राज्य गोमाता आयोगाच्या desi cow conservation अध्यक्षांनी सांगितले की, देशी गोवंशाचे महत्त्व, पंचगव्याचे उपयोग, गो-आधारित शेतीचे फायदे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे हा या संवाद यात्रेचा मुख्य उद्देश आहे. विदर्भातील दुष्काळी भागात देशी गाईचे संगोपन वाढल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यावेळी व्यासपीठावर राज्य गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, गजानंद माऊली विविध आखाड्यांचे महंत, गोसेवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. बाबूसिंग महाराज यांनी आयोगाच्या अध्यक्षांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.