विजय माहुरे
सेलू
dindi-for-alandi "ज्ञानोबा-तुकाराम",संत केजाजी महाराजांचा नाम जप,"माऊली-माऊली"च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात घोराड येथील संत केजाजी महाराज वारकरी पायदळ दिंडीचे आळंदीकडे उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. यंदा या दिंडीच्या वारीचे २३ वे वर्ष असून, ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना गावाच्या सीमेवर निरोप दिला.
dindi-for-alandi विशेष म्हणजे, घोराड गावातून आळंदीकडे प्रस्थान करणारी ही पहिली दिंडी आहे. गेली २३ वर्षे अखंडपणे वारीची परंपरा जपत ही दिंडी संतांच्या विचारांचा आणि भक्तीचा संदेश देत आहे.
dindi-for-alandi प्रस्थानापूर्वी दिंडीतील वारकऱ्यांनी विठ्ठल रुख्माई देवस्थान मध्ये भजन आणि आरती केली. त्यानंतर भगव्या पताका फडकवत,दिंडी भवानी मंदिरात आली येथे दिंडीचा दिवसाचा मुक्काम होता येथून ही दिंडी सायंकाळी ४ वाजता गावातील मुख्य मार्गांनी सेलू विकास चौक गावाच्या सीमेवर आली येथून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "माऊली-माऊली"च्या जयघोषात दिंडी आळंदीकडे खाजगी वाहनाने मार्गस्थ झाली. महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालवारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
dindi-for-alandi या दिंडीचे नेतृत्व दिंडीचालक ह.भ.प. नरेश महाराज गुघाने करीत असून, विणेकरी ह . भ. प.पुरुषोत्तम गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी शिस्तबद्धपणे वारीचा प्रवास करीत आहे.
dindi-for-alandi दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून रस्ता सजविला होता, जागोजागी कुमकुम तिलक लावला जात होता जागोजागी वारकऱ्यांचे स्वागत केले. तसेच गावाच्या सीमेवर गुड्डू तेलरांधे यांचे घरी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या दिंडीने परिसर विठ्ठलनामाने दुमदुमून गेला असून, वारकरी संप्रदायाची भक्ती, समता, सेवा आणि शिस्त यांचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला गेला
dindi-for-alandi संत केजाजी महाराज यांच्या नावाने पायदळ वारी २३ वर्षापासून सुरू असून या वारी मध्ये सेलू तालुक्यातील डॉ. सुरेंद्र भुते, व डॉ. दिलीप बोबडे दिनांक १५ रोजी लोणंद येथे मोफत उपचार व आरोग्य सेवा देणार आहे. या दिंडी करीता अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला असून तंबू, पाण्याचा टँकर, सकाळ संध्याकाळची पंगत,यासाठी सहकार्य केले आहे.२० दिवस असणाऱ्या या दिंडीत हजारांच्यावर वारकरी सामील होणार आहे.या दिंडीचे आयोजन अखिल भारतीय महा वैष्णव वारकरी सेवा संस्था यांचे वतीने करण्यात आले आहे