नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वांनी अधिक सजग राहणे गरजेचे : शाहू भगत

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
मानोरा,
disaster management awareness पावसाळा ऋतू दरम्यान पूर, वादळ, वीज कोसळणे, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुयातील प्रत्येक जबाबदार नागरिकांनी अधिक सजग राहून आपत्ती निवारणामध्ये जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.
 

disaster management awareness 
मानोरा पोलिस स्टेशनच्या आवारात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या वतीने आपत्ती मित्र प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर व तालुयातील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्वतयारी महत्त्वाची पावसाळ्यापूर्वी नाले-गटारे साफ करावीत. धोकादायक इमारती, झाडे यांची माहिती प्रशासनाला द्यावी. वादळी वार्‍यासह पाऊस सुरू असताना झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ थांबू नये. नदी - नाल्यांना पूर आल्यास पुलावरून पाणी वाहत असेल तर ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. कोणतीही आपत्ती आल्यास ग्रामस्तरावर प्रथम पोलिस पाटील, तलाठी यांना कळवावे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७७/१०० (पोलिस) वर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक नयना पोहेकर यांनीही आपत्ती काळात महिला व लहान मुलांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाकडून येणार्‍या सूचनांचे पालन करा. आपल्या गावातील वृद्ध, दिव्यांग व गरोदर महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन त्यांनी केले.