सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक

५.४२ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी अटकेत

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
नागपूर,
illegal transport of scented tobacco केळवद पोलिस स्टेशनच्या पथकाने पांढुर्णा ते सावनेर रोडवरील भागेमाहेरी शिवार येथे नाकाबंदी करून एका आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्याकडून कार आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह एकूण ५ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जय रवी कडू (२८ वर्ष, रा. खापरखेडा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
illegal transport of scented tobacco
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केळवद पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की, एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भागेमाहेरी शिवार परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान, संशयास्पद वाटणारे चारचाकी वाहन (क्र. एम एच-४३, ए डब्ल्यु-१८३२) अडवून त्याची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान वाहनात वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाला आढळून आला.
 
 
या कारवाईत पोलिसांनी १९.६०० किलोग्रॅम सुगंधित तंबाखू व पानमसाला, एक मोबाईल आणि ५ लाख रुपयांची कार, असा एकूण ५,४२,६०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. या प्रकरणी केळवद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.