नागपूर,
Inner Wheel Club आगामी नाशिक महाकुंभ यात्रेच्या स्वच्छता अभियानाला हातभार लावत इनरव्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटी (डिस्ट्रिक्ट ३०३) यांच्या वतीने दोन मोठ्या कचरा पेट्या (डस्टबिन) प्रदान करण्यात आल्या.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या Inner Wheel Club या उपक्रमातून महाकुंभ परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन मनीषा चौधरी, अध्यक्षा स्मिता बागडदेव, स्वाती वानकर, शारदा रोशनखेडे, वैशाली चिंचोळकर, सुप्रिया पाठक, सीमा मेटांगळे तसेच क्लबच्या माजी अध्यक्षा व सदस्य उपस्थित होते.
सौजन्य: देवराव प्रधान,संपर्क मित्र