खर्रा पन्नीवरून चाकूहल्ला

वडगाव खुर्द येथील घटना

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
सेलू
knife attack तालुक्यातील वडगाव खुर्द येथे खर्रा पन्नीवरून वाद झाला. वादाचे रुपांतर चाकू हल्ल्यात झाले. ही घटना शनिवार ४ रोजी रात्री घडली. यात साहिल उर्फ करण सातपुते (१९) रा. वडगाव खुर्द हा गंभीर जखमी झाला.
 
knife attack
 
 
knife attack शनिवारी रात्री साहिल हा मंगेश पिंजरकर (४२) याच्या घरासमोरील चौकात आला. साहिलने चौकात खर्र्याची पन्नी फेकली. इथे पन्नी का फेकली म्हणून मंगेश पिंजरकर याने साहिलशी वाद घातला. सुरूवातीला शाब्दिक खडाजंगी झाली. दरम्यान, मंगेशने सुरूवातीला काठीने साहिलच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर घरातून चाकू आणून साहिलवर वार केले. यात साहिल गंभीर जखमी झाला. साहिलला सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले.
 
knife attack घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी वडगाव खुर्द गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, मंगेश पिंजरकर याने स्वतः सेलू पोलिस ठाण्यात आत्मसमर्पन करून गुन्ह्याची कबुली दिली.