विदेशी मद्यसाठ्यासह ४.८५ लाखा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
वाशीम
liquor-seized गोवा राज्यात निर्मीत विक्रीस असलेली तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्यसाठा एका चारचाकी वाहनातुन जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात त्यांच्याकडून ४ लाख ८५ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

washim photo 
 
liquor-seized  ४ जुलै रोजी मंगरुळनाथ तालुयातील मानोली ते मोतसावंगा रोडवर काही इसम अवैधरीत्या गोवा राज्यात निर्मीत विक्रीस असलेली तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य एका चारचाकी वाहनातुन वाहतुक करीत असल्याबाबत मिळालेल्या खात्रीलायक व गोपनिय माहिती च्या आधारे सापळा रचून तपासणी केली असता एक टाटा कंम्पनीचे एमएच ४७ वाय ३६११ क्रमांकाचे चार चाकी वाहन ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री करीता प्रतिबंधीत असलेला व गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्याचा साठा ज्यामध्ये १८० मीली क्षमतेच्या रॉयल चॉलेंज व्हीस्की, आयकॉनीक व्हाईट व्हीस्की, रॉयल स्टॉग व्हीस्की या बॅन्डच्या एकुण ३६० सिलबंद बॉटल तसेच ७५० मीली क्षमतेच्या रॉयल क्वीन व्हीस्की, गोल्ड अ‍ॅड ब्लॅक रम च्या एकुण १४४ सिलबंद बॉटल विदेशी दारु साठ्याच्या एकुण २० पेटी जप्त करण्यात आल्या असून सदर कारवाईमध्ये एकुण ४ लाख ८५ हजार ६८० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
 
 
liquor-seized  या प्रकरणी दिगंबर रमेश पवार वय ३७ रा. भिलडोंगर ता. मानोरा जि. वाशीम ह.मु. शिवाजी नगर वाशीम व प्रविण भगवानदास वर्मा वय ५० रा. सोनखास ता. मंगरुळनाथ जि. वाशीम यांना अटक करण्यात आलेली आहे.सदर कारवाईमध्ये निरीक्षक भरारी पथक एम.के. उईके, सु. दी. चव्हाण, एम.एस. जाधव, आर. पी. मनवर, निवृत्ती तिडके, नितीन चिपडे, ललित खाडे, स्वप्नील लांडे, विष्णू मस्के, गणेश नानोटे, निकेश घुले, महीला जवान वैष्णवी सारघोडे, संजय मगरे, गणेश सपकाळ यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास दुयम निरीक्षक मधुकर जाधव हे करीत आहेत.