देवळीत अखेर ‘नमो उद्यान’ फुलणार!

नागरिकांना आधुनिक विरंगुळ्याची सुविधा : आ. बकाने

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
देवळी
namo-udyan  येथील नमो उद्यानावरून आरोप प्रत्यारोप झाले. विशेष सभाही घ्यावी लागली. नवी आणि जुना हा वाद जिल्हाधिकार्यांच्या कोर्टात पोहोचला. जिल्हाधिकार्यांनी ठरलेल्या जागेवरच नमो उद्यान करण्याचा आदेश दिला. आज ५ रोजी आ. राजेश बकाने यांच्या हस्ते नमो उद्यानचे भूमिपूजन झाल्याने शहरातील विरंगुळ्यासाठी नव्याने तयार होणार्या उद्यानाचा मार्ग मोकळा झाला असुन उद्यान फुलणार असेच म्हणावे लागेल.

namo 
 
namo-udyan  नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात येणार्या ‘नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आ. राजेश बकाने यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे, नप उपाध्यक्ष राहुल चोपडा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयंत कावळे, प्रमोद ठाकरे, मुरलीधर तपासे, नगरसेवक संतोष भोयर, मंगला पिंपळकर, शीतल तर्हेकर, विलास जोशी, प्रकाश चांभारे, पाणीपुरवठा सभापती प्रेमेंद्र ढोक आदी उपस्थित होते.
namo-udyan  यावेळी आ. राजेश बकाने म्हणाले की, शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा घडवून आणणे हे आपले उद्दिष्ट आहे. ‘नमो उद्यान’मुळे लहान मुले, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व आधुनिक वातावरणात विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होईल. शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी आणून अशा लोकाभिमुख प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे आ. बकाने म्हणाले.
 
namo-udyan  यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे. आ. राजेश बकाने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहरात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. ‘नमो उद्यान’ हा प्रकल्प शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षा पूर्ण करणारा ठरेल. भविष्यातही विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांच्या हितासाठी नगर परिषद कार्यरत राहील, असे ते म्हणाले.
namo-udyan  उपाध्यक्ष चोपडा यांनी नमो उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यवृद्धीबरोबरच पर्यावरण संवर्धन, नागरिकांचे आरोग्य आणि सामाजिक संवादाला चालना मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.