नपच्या नर्सरी वर्गाचे उद्घाटन

जिल्ह्यात पहिलाच प्रयोग

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे)
municipal-council नगर परिषदेच्या राजेंद्र आणि कस्तुरबा प्राथमिक शाळेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या नर्सरी वर्गाचे उद्घाटन झाले. या उपक्रमामुळे लहान मुलांना दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे, हे उल्लेखनिय! अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राणी कलोडे होत्या. उद्घाटक म्हणून जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भार्गव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वनमाली, उपाध्यक्ष अकिल शेख उपस्थित होते.

sindi
 
 
municipal-council  यावेळी नव्याने सुरू झालेल्या नर्सरी वर्गामुळे विद्याथ्र्यांना गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास डॉ. संजय भार्गव यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाची तयारी तीन महिन्यांपासून सुरू होती. आज हा सूवर्ण योग आला, त्यासाठी अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे शिक्षण सभापती राजश्री बोरीकर यांनी नमूद केले.
municipal-council  नगर परिषदचे विविध पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बाल शिक्षणाचे महत्त्व सांगून, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. नगर परिषदेमार्फत विद्याथ्र्यांना दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम येथे राबविले जात असल्याची माहिती मुख्याधिकारी पौर्णिमा गावित यांनी दिली.
municipal-council  नर्सरी वर्गात शैक्षणिक साहित्य, खेळणी, आकर्षक भित्तीचित्रे आणि बालसुलभ वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. याप्रसंगी नवागत बालक-बालिकांचे पालकांसह पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. संचालन भगवंत पवार यांनी केले. आभार नगरसेवक शरद तळवेकर यांनी मानले.