कारंजा (घा.)
obstruct students' path गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील पंचायत समितीच्या मुख्य द्वारापासून ते न्यायालयापर्यंत असलेल्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने आणि त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने विद्याथ्र्यांची शाळेत जाण्या-येण्याची वाट बिकट झाली आहे.
obstruct students' path कारंजा शहरात प्रवेश करणार्या मुख्य मार्केटच्या रस्त्यानंतर दुसरा महत्त्वाचा रस्ता म्हणजेच न्यायालयापुढील बोगद्यापासून मॉडेल हायस्कूल समोरून पंचायत समितीकडे जाणारा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. या रस्त्याने न्यायालय, मॉडेल हायस्कूल, पंचायत समिती कार्यालय अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. या रस्त्यावर मॉडेल हायस्कूलपुढे मोठमोठी खड्डे पडल्याने त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून झालेल्या चिखलामुळेे विद्यार्थी व नागरिकांची प्रचंड अडचण निर्माण झाली आहे.
obstruct students' path रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यंचे प्रचंड हाल होत आहेत. नपं प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांकडून होत आहे.
सकाळच्या सुमारास शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळेत या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे शाळेला जाणार्या विद्याथ्र्यांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. शाळेत जात असताना खड्ड्यातील पाण्यामुळे मुलांचे गणवेश खराब होणे, दप्तर भिजणे अशा घटना घडत आहे. कधी-कधी खड्डे चुकवताना मुलं पाय घसरून पडत आहेत. विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय पाहता, तात्पुरत्या स्वरूपात मुरूम किंवा खडी टाकून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.