४०० विद्याथ्र्यांनी घेतली वाहतूक नियम पाळण्याची प्रतिज्ञा

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
Traffic rules शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गांमधील विद्याथ्र्यांच्या भेटी घेऊन अपघात कमी व्हावेत वाहतूक नियमाचे पालन अभियानात बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी कॉलेज सेवाग्राम येथील ४०० विद्याथ्र्यांना पोलिस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक फौजदार जावेद खान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ४०० विद्याथ्र्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रतीज्ञा घेतली.
 
 

rto
 
विद्याथ्र्यांनी देशासाठी राष्ट्रीय एकता, देश प्रेमकरिता प्राधान्य द्यावे शिस्त, अनुशासनमध्ये प्रशिक्षण करावे, परेड व व्यायाम करून शारीरिक क्षमता वाढवावे, अभ्यासात कठोर परिश्रम घ्यावे व यश संपादन करून जिल्ह्याचा गौरव वाढवावा. त्यामध्ये विद्याथ्र्यांनी वाहन चालवण्याचा परवाना काढावा, अतिवेगाने वाहन चालवू नयेत, हेल्मेटचा वापर करावा, अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये, वाहन चलविताना मोबाईलचा वापर करू नये, रस्त्यावर अपघात झाला असल्यास मदतीकरिता रुग्णवाहिकेकरिता १०८ वर कॉल करावे, पोलिस मदत करिता टोल फ्री नंबर ११२, महिला हेल्प लाईन न १०९१, १०९८ वर संपर्क करावा, मुलीच्या सुरक्षितते करिता असलेले कायदे कलम याबाबत , गुड टच, बेड टच, याबाबत माहिती दिली. अनोळखी फोन कॉलवर आपली बँकबाबत माहिती देऊ नये, असे आवाहन केले.