वैष्णवी कॉम्पलेक्स परिसरातील देह व्यापारावर छापा

एका पीडितेची सुटका, दोघांना अटक

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
वर्धा
prostitution-racket अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने वैष्णवी कॉम्पलेक्स परिसरात देहव्यापार करणार्या आरोपींच्या घरी छापा टाकून एका पीडितेची सुटका केली. ही कारवाई शनिवार ४ रोजी करण्यात आली.
 
wardha photo
 
prostitution-racket रूपा नामक महिला वैष्णवी कॉम्पलेक्स कारला रोड ही राज्यातील व परराज्यातील मुलींना देहव्यापारास प्रवृत्त करते. या मुलींना स्वतःच्या घरी बोलावून देहव्यापार करीत असल्याची माहिती मिळाली. बनावट ग्राहक तयार करुन त्या महिलेच्या घरी छापा टाकला. तिथे रूपा गव्हाळे (३३) व तिचा पती गणेश महाले (४३) हे होते. घराची पाहणी केली असता एका खोलीत बनावटी ग्राहक व एक पीडित महिला देहव्यापार करताना मिळून आले. पीडिेतेला विचारपूस केली असता तिने नागपूर येथील असल्याचे सांगून तिला रूपा गव्हाळे हिने बोलविल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करून ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पीडित महिलेला महिला सुधार गृह येथे दाखल करण्यात आले आहे.

prostitution-racket ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, विजयसिंह गोमलाडू, पोलिस कर्मचारी अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, अमोल नगराळे, मंगेश चावरे, नवनाथ मुंडे, अल्का कुंभलकर आदींनी केली आहे.