'बँडरोल'चा कहर! रशियाच्या नव्या क्षेपणास्त्राने युक्रेनची वाढली चिंता

नवीन घातक एस-८००० बँडरॉल मिसाईल

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
माॅस्को,
russias new missile रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धात तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांच्या पातळीत एकदम बदल झाला आहे. या पृष्ठभूमीवर रशियाने तैनात केलेल्या नवीन ‘एस-८००० बँडरोल या क्रूझ क्षेपणास्त्राने युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर गंभीर संकट निर्माण केले आहे. हे शस्त्र म्हणजे पारंपरिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोनचे एक जीवघेणे मिश्रण आहे. यात चीनचे इंजीन; अमेरिकन रेग्युलेटरचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्यासमोर हे क्षेपणास्त्र कसे रोखायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
russias new missile
 
बँडरॉल क्षेपणास्त्र पाडण्यातील सर्वांत मोठे आव्हान त्याच्या वेगात आणि इंजिनमध्ये आहे. या क्षेपणास्त्राचा वेग ५२० ते ५६० किमी प्रतितास आहे. हा वेग कमाल ६५० किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. क्षेपणास्त्र आणि ड्रोन रोखण्यासाठी युक्रेनचे सैन्य मोबाईल फायटर टीमचा वापर सामान्यपणे करते. यात जमिनीवरील मशीन गनच्या माध्यमातून हवेतील लक्ष्य उद्ध्वस्त केले जाते. बँडरोल जेट इंजिनमुळे या क्षेपणास्त्राचा वेग इतका प्रचंड असतो की, मशीनगनचा वापार करून अचूक नेम घेत ते पाडणे अशक्य होेते. हे क्षेपणास्त्र रोखण्यासाठी गेपार्डसारखी अत्याधुनिक प्रगत आणि स्वयंचलित विमानविरोधी यंत्रणेची गरज आहे. ही यंत्रणा वेगाने उडणाऱ्या लक्ष्यांचा माग काढते.
 
पारंपरिक रशियन क्रूझ क्षेपणास्त्रांच्या तुलनेत बँडरोलचा आकार खूप लहान आहे. याची लांबी जवळपास पाच मीटर आणि २.२ मीटरचा विंगस्पॅन आहे. सोबतच रडारला गुंगारा देण्याची क्षमता यात आहे. अत्यंत कमी जागेत वळण घेण्याचे तंत्र क्षेपणास्त्रात असल्याचे युक्रेनी गुप्तचर विभागाच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे बँडरोल सहजपणे युक्रेनचे हवाई सुरक्षा रडार आणि क्षेपणास्त्र यंत्रणेला गुंगारा देते. याचा उड्डाण मार्ग शोधणे अत्यंत कठी असते.
जॅमिंगविरोधी ‘कोमेटा’ अँटिना तंत्रज्ञान
 
हवाई सुरक्षा भेदण्यासाठी या क्षेपणास्त्रात रशियाच्या अतिप्रगत कोमेटा डिजिटल सॅटेलाईट नेव्हिगेशन अँटेना यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानासमोर युक्रेनची इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणजेच जॅमिंग यंत्रणा पूर्णत: निष्प्रभ ठरली आहे. युक्रेनियन सैन्याने क्षेपणास्त्राच्या जीपीएस किंवा नेव्हिगेशनमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, तर हा अँटी-जॅमिंग अँटेना क्षेपणास्त्राला त्याच्या लक्ष्याकडे सुरक्षितपणे जाण्यास मदत करतो. या कारणामुळे, प्रत्यक्षपणे नष्ट न करता केवळ सिग्नल रोखून ते थांबवणे जवळपास अशक्य होते.
 
रशियाची उत्कृष्ट ई-कॉमर्स युक्ती
निर्मिती आणि पुरवठा साखळी या क्षेपणास्त्रातील सर्वांत आश्चर्यजनक बाब आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही या क्षेपणास्त्रात ३० वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांचे २० पेक्षा जास्त महत्त्वाचे घटक आणि सुमारे २० मायक्रोचिप्स आहेत. याच चीनच्या स्विविन एसडब्ल्यू ८०० प्रो जेट इंजिनचा वापर करण्यात आला. साधारणपणे याचा वापर रिमोट कंट्रोलच्या विमानांसाठी केला जातो. हे इंजिन अलीएक्सप्रेस नावाच्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर केवळ १६ हजार डॉलर्समध्ये मिळते. या व्यतिरिक्त यात जपानच्या मुराता बॅटरी, दक्षिण कोरियाची डायनामिस्कल सर्व्हो मोटर्स आणि अमेरिकी तसेच स्विसच्या मूळ व्होल्टेज रेग्युलेटर आणि मायक्रोकंट्रोलर्सचा वापर केला आहे.