सावनेर न्यायालयात मध्यस्थी जागृती

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
नागपूर, (सावनेर)
Savner Court सावनेर तालुका विधी सेवा समिती व सावनेर तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ दिवाणी न्यायालयात "मध्यस्थी जागृती कार्यक्रम" उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.
 

savner 
 
 
यावेळी ॲड. एस. एम. पांडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. पी. जैन व सचिव ॲड. ए. वाय. निंबाळकर यांनी मध्यस्थीचे महत्त्व स्पष्ट केले.Savner Court अध्यक्षीय भाषणात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एम. जे. मोहोड यांनी मध्यस्थीमुळे वेळ व पैशाची बचत होत असून वाद सामंजस्याने निकाली निघतात, त्यामुळे समाजात सलोखा निर्माण होतो, असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन ॲड. ए. वाय. निंबाळकर यांनी केले, तर उपाध्यक्ष ॲड. भोजराज सोनकुसारे यांनी आभार मानले. कर्मचारी व वकिलांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
सौजन्य:अनिल सोलंकीसंपर्क मित्र