सेमीकंडक्टर प्रकल्प कॉंग्रेसमुळे रखडला

पंतप्रधान मोदींचा घणाघात,

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |

 

 
गांधीनगर 

pm modi  सुमारे दोन दशकापूर्वी गुजरातचा मुख्यमंत्री असताना राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची संपूर्ण योजना तयार केली होती. मात्र, केंद्रातील तत्कालीन कॉंग्रेस सरकारने प्रकल्पाचा धुडकावला. विकासविरोधी सरकारमुळे हा प्रकल्प रखडला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.
modi today
 
pm modi गुजरातच्या सानंद येथे त्यांनी ‘सीजी सेमी’च्या आउटसोर्स केलेल्या सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (ओएसएटी ) प्रकल्पाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी आपल्या जुन्या अपुऱ्या प्रकल्पाचा उल्लेख करत कॉंग्रेसवर टीका केली. २० वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्याहूनही आधी, मी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती. मी गांधीनगर आणि प्रांतिजजवळ ३५० ते ४०० एकर जमिनही निश्चित केली आणि काही कंपन्यांशी चर्चाही झाली होती. त्यावेळच्या केंद्रातील कॉंग्रेस सरकारने प्रकल्पाला मंजुरी दिली नाही आणि प्रकल्प रखडला. त्यावेळी मी सेमीकंडक्टर विषयावर बोलायचो, तेव्हा प्रसारमाध्यमे माझी थट्टा उडवत होते. तेव्हा हे होऊ शकले नाही. मात्र, आज ते प्रत्यक्षात येताना पाहून मला प्रचंड आनंद होत आहे.
 
pm modi दशकाच्या प्रयत्नामुळे उद्योगांचा विस्तार

भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाचा विस्तार एका रात्रीत झालेला नाही; गेल्या दशकात भारतात झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचे हे फलीत आहे. सानंदमधील सीजी सेमी ओसॅट चिप उत्पादन प्रकल्प आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देईल आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये भारताचे स्थान अधिक मजबूत करेल. भारताला सेमीकंडक्टर उत्पादनात आत्मनिर्भर आणि आघाडीचा देश बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.


pm modi भारत जे ठरवतो ते साध्य करतो

देश आपला दृढनिश्चय कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्षात उतरवतो. भारत जे ठरवतो ते साध्य करतो. पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या धोरणात्मक दृष्टिकोनाची आठवण करून देताना मोदींनी सांगितले की, देशाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. आम्ही ‘डिझाइन इन इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ या मूळ मंत्रासह यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी या प्रकल्पाताल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.