Sowing crops on cremation ground land स्मशानभूमीच्या जमिनीवर मशागत करून बियाणे पेरणी केल्याचा गंभीर प्रकार कोनदरी येथे उघडकीस आला असून अतिक्रमण करणाèया व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी सरपंच रवींद्र पवार यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तालुक्यातील कोनदरी गावालगत सार्वजनिक स्मशानभूमीसाठी शेत सर्व्हे क्रमांक 116 भोगवटदार 2 शासकीय फ वर्गातून ही जमीन हस्तांतरित करण्यात आली होती. या जमिनीवर स्मशानभूमीचे दहनशेड उभारण्यात येऊन नागरिकांच्या बसण्यासाठी बेंचची सुद्धा व्यवस्था करण्यात आली.
तसेच विविध योजनांच्या माध्यमांतून वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्यात आले. परंतु गावातील शंकर सवाई राठोड या इसमाने कोणतीही परवानगी न घेता मनमानी करीत जबरदस्तीने जमिनीची मशागत करून त्यामध्ये तूर पिकाची पेरणी करून सर्व जमिनीला संरक्षणासाठी लोखंडी अँगल उभारून जाळी लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला आहे.
यामुळे गावात एखादी अनुचित घटना घडली तर, किंवा एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा मोठा प्रश्न गावकèयांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे राठोड याच्या या दादागिरीने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या गंभीर प्रकारामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी स्मशानभूमीच्या जमिनीवर अतिक्रमण करणाèया शंकर राठोड याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन हे स्मशान अतिक्रमणमुक्त करण्यात यावे अशी मागणी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र पवार यांनी तहसीलदारांकडे केली आहे. ते या गंभीर प्रकारावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.