नागपूर
Signal Jumpers शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, यावर्षी जून अखेरपर्यंत तब्बल ६ हजार २७८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सातत्याने होणाऱ्या ‘सिग्नल जम्पिंग’मुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. वाहतूक पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्या चक्क ६ हजार २०० वर वाहनचालकां दंडात्मक कारवाई केली आहे.

Signal Jumpers शहरात सुसाट वाहने चालवून चक्क रेड सिग्नल तोडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये रेड सिग्नल असतानाही वाहनचालकांकडून बेफिकीरपणे वाहने पुढे पळवली जातात. अशा प्रकारामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच गंभीर अपघातांची शक्यताही वाढते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष तपासणी, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ई-चलान प्रणालीच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये जूनअखेरपर्यंत ३२ हजार ६०६ वाहनचालकांनी सिग्नलचे उल्लंघन केले होते. तर २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात ४८ हजार २८६ वाहनचालकांनी रेड सिग्नल तोडल्याची नोंद झाली होती. यंदा जूनअखेरपर्यंत ६ हजार २७८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
Signal Jumpers वाहतूक पोलिसांच्या मते, ‘सिग्नल जम्पिंग’ ही केवळ वाहतूक नियमांची पायमल्ली नसून ती स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळण्यासारखी बाब आहे. काही सेकंदांचा वेळ वाचविण्याच्या नादात अनेक वाहनचालक स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे अशा नियमभंग करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखविली जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
Signal Jumpersसीसीटीव्हीतून चालान कारवाई
शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविणे, सीसीटीव्हीद्वारे सतत निरीक्षण ठेवणे आणि ई-चलानद्वारे तत्काळ दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून रेड सिग्नलला थांबावे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा आणि सुरक्षित वाहनचालना करावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे वाहतूक शिस्त सुधारण्यास मदत होणार आहे.
Signal Jumpers ... ते शेवटचे ५ सेकंदरेड सिग्नल असल्यानंतर ६० ते ९० सेकंदाचा वेळ सिग्नलवर वाहनचालकांना थांबणे कंटाळवाणे वाटते. रेड सिग्नल संपण्यासाठी ८ ते ९ सेकंदाचा वेळ बाकी असताना वाहनचालक वाहन सुरू करून पुढे न्यायला लागतात. शेवटचे पाच सेकंद बाकी असताना अनेक वाहनचालक सुसाट वाहने पळवितात. अशा घाईत यलो सिग्नलमध्ये धावणाऱ्या वाहनासोबत समोरासमोर टक्कर होण्याची भीती असते. याच पाच सेकंदाच्या वेळेतच सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे.