मुंबई,
state government नागरिकांपर्यंत अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती वेगाने पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आता सोशल मीडियावरील ‘व्हॉट्सॲप चॅनल’ आणि ‘पब्लिक ॲप’वर आपली अधिकृत व प्रमाणित खाती सुरू केली आहेत. त्यामुळे आता राज्यातील शासकीय घडामोडी आणि विविध योजनांचे थेट अपडेट्स नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर घरबसल्या मिळणार आहेत.
नागरिकांना आता ‘व्हॉट्सॲप’ चॅनलवर डीजीआयपीआर, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र’ या नावाने, तर स्थानिक मजकूर देणाऱ्या ‘पब्लिक ॲप’वर ‘महाराष्ट्र शासन ॲटदरेटमहाडीजीआयपीआर’ या नावाने सनाचे अधिकृत खाते उपलब्ध झाले आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्म्समुळे जनतेपर्यंत माहिती अधिक गतीने आणि व्यापक स्वरूपात पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.
शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासनाचे विविध लोकोपयोगी उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्याबाबत जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहोचवण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालय पार पाडत असते. डिजिटल क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणून वेगाने लोकप्रिय होत असलेल्या 'व्हॉट्सॲप चॅनल' आणि 'पब्लिक ॲप'वर महासंचालनालयाने आपली उपस्थिती नोंदवली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका; शासनाचे आवाहन
सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती किंवा अफवा पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, शासनाच्या अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी या प्रमाणित माध्यमांना फॉलो करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.