उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाणले शेतकऱ्यांचे म्हणणे

शक्तीपीठसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
वर्धा
shaktipeeth-highway शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील वर्धा व देवळी या दोन तालुक्यातून जात असून या दोन तालुक्यातील १६ गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहे. जमीन संपादन प्रक्रियेचा एक भाग म्हणून उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी दोन्ही तालुक्यातील तब्बल ५०६ शेतकऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्या आक्षेपांची सुनावणी घेतली. विशेष म्हणजे सुनावणीसाठी ५०६ पैकी २८७ शेतकरी उपस्थित होते.

shaktipeeth 
 
 
shaktipeeth-highway शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित जमिनीची मोजणी भूमि अभिलेख विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. जमिनीचा संयुक्त मोजणी अहवाल उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित जमिनीला बाजार भावाच्या ५ पट मोबदला मिळणार आहे. सुनावणीच्या अनुषंगाने वर्धा तालुक्याच्या दिग्रस येथील ३८, तिगाव २८, रोठा २१, धोत्रा रेल्वे ५७, पढेगाव ४७, चिकणी येथील २९ तर देवळी तालुक्यातील देवळी येथील ५५, इसापूर ४४, काजळसरा ५६, वाटखेडा १०, बाबुळगाव खोसे २६, सैदापूर ४, कर्मलापूर ७, खर्डा येथील ३४ शेतकर्यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली होती. प्रत्यक्षात वर्धा तालुक्यातील सहा गावांपैकी १२९ तर देवळी तालुक्यातील दहा गावांतील १५८ शेतकरीच सुनावणीला हजर होते.
shaktipeeth-highway शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा तालुक्यातील दिग्रस, पांढरकवडा, झाडगाव, गणेशपूर, तिगाव, रोठा, धोत्रा (रेल्वे), निमगाव, पढेगाव, चिकणी तर देवळी तालुक्यातील देवळी, इसापूर, काजळसरा, वाटखेडा, बाभूळगाव (खोसे), सैदापूर, कर्मलापूर, वाबगाव, काशिमपूर, खर्डा या गावातून जाणार आहे. पांढरकवडा, झाडगाव, गणेशपूर व निमगाव येथे अतिरित जमीन संपादित करण्याची गरज नसून समृद्धीसाठीच्या जमिनीचा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासाठी वापर होणार असल्याचे सांगण्यात आले.