तराशमध्ये चमकले उमरखेडचे विद्यार्थी

महात्मा फुले शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

उमरखेड,
umarkhed student success ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावत 11 लाख रुपयांचे बक्षीस घेणारी शाळा शिवाय एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम येणाèया महात्मा फुले शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आयोजित परीक्षेत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त केले.
 

umarkhed student success, 
टॅलेंट ऍम्पिफिकेशन ऑफ रुरल युथ स्किल हंट म्हणजेच तराश या संघटने अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड म्हणजेच डब्ल्यूसीएल कंपनीने सीएसआर अंतर्गत इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली. यात महात्मा फुले विद्यालयाची दुर्गेश्वरी जाधव व गोविंदराज नलावडे या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
 
 
परीक्षेत एक umarkhed student success हजारच्यावर विद्यार्थी बसले. त्यातून फक्त चाळीस पात्र विद्यार्थी निवडण्यात आले. वीस विद्यार्थी हे अभियंता विभागासाठी आवश्यक असणारी जेइइ आणि वीस विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षेसाठी पात्र ठरले.परीक्षेतील उत्तीर्ण चाळीस विद्यार्थ्यांचा इयत्ता अकरावी बारावीचा संपूर्ण शैक्षणिक खर्च तसेच जेइइ आणि नीट परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा शैक्षणिक खर्च त्यांचा निवास भोजन खर्च व्यवस्था आणि एक हजार रुपये मासिक विद्या वेतन देखील देणार आहे.कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर खर्च करावा लागतो.या विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिक शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, सचिव डॉ. यादव राऊत मुख्यध्यापक प्रमोद देशमुख पर्यवेक्षक राणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हब तयार करण्याकडे वाटचाल
शहराची किंबहुना तालुक्याची ओळख ही शैक्षणिक हब म्हणून करण्याकडे वाटचाल सुरू आहे. विविध परीक्षा आयोजित करणे, क्रीडा शिक्षण आरोग्य या विषयांवर विद्यार्थ्यांचा अधिकाधिक विकास करणे हाच उद्देश ठेवून वाटचाल सुरू आहे
- राम देवसरकर
संस्थाध्यक्ष, महात्मा फुले विद्यालय