वर्धा सोनार समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
Wardha Sonar Society वर्धा सोनार समाजाच्या वतीने दहावी, बारावी तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाजातील ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव व सत्कार देशमुख लॉन येथे आयोजित कार्यक्रमात केला.
 
 
Wardha Sonar
 
अध्यक्षस्थानी डॉ. विकास ढोमणे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील शेट्ये, प्रमुख अतिथी सुलक्ष्मी घोडे, दिलीप कठाने, रोहन कठाने, देवीदास करंडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्याथ्र्यांच्या यशाचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर भविष्यात उच्च ध्येय गाठण्याचा संदेश दिला. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांचेही विशेष कौतुक केले. यशस्वीतेसाठी वर्धा सोनार समाजाचे पदाधिकारी, युवक समिती, महिला मंडळ, कार्यकर्ते तसेच सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले.