धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे १२५ जणांचा सत्कार

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Dhangar Officers and Employees Association धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा नागपूर यांच्या वतीने श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृह, बालाजी नगर विस्तार येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन, समुपदेशन तसेच गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त, नवनियुक्त व पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
 

dhana 
 
 
 
अध्यक्षस्थानी अनिलकुमार ढोले, तर प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना करिअर, स्पर्धा परीक्षा, कृषी, वैद्यकीय शिक्षण व पोलीस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.Dhangar Officers and Employees Associationसोहळ्यात दहावी, बारावी व पदवीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त, नवनियुक्त, पदोन्नतीप्राप्त कर्मचारी आणि समाजबांधवांचा असा एकूण १२५ जणांचा शाल, स्मृतिचिन्ह व शिल्ड देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन किशोर चिडे व शीतल गावंडे यांनी, तर आभार प्रदर्शन यशवंत कातरे यांनी केले.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे,संपर्क मित्र