वर्धा,
birthday eco initiative school स्थानिक सांदीपनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्याथ्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीला चालना देणारा एक अभिनव व प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत विद्याथ्र्यांनी वाढदिवसानिमित्त चॉकलेट किंवा इतर खाद्यपदार्थ वाटप करण्याऐवजी शाळेला एक रोप किंवा कथा पुस्तक भेट द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्याथ्र्यांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, वृक्षसंवर्धनाची जाणीव रुजविणे तसेच वाचनाची आवड वाढविणे हा उद्देश आहे. विद्याथ्र्यांनी भेट दिलेल्या रोपांमुळे शाळेचा परिसर अधिक हिरवा व निसर्गरम्य होण्यास मदत होणार असून, कथा पुस्तकांच्या माध्यमातून शाळेच्या ग्रंथालयाची समृद्धी वाढणार आहे. या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव यांची प्रमुख उपस्थिती होती. सहसंचालक मेघा कुलकर्णी, मुख्याध्यापक सागर झाडे यांची उपस्थिती होती.