भाजपकडून नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांचे स्वागत

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
अहेरी,
bjp अहेरी येथे नुकतेच रुजू झालेले नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) हेमंत चांदेवार यांचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
 

bjp welcomes newly appointed sdpo hemant chandewar in aheri 
यावेळी अहेरी उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने राखण्याची जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिस प्रशासन आणि जनतेमधील समन्वय अधिक दृढ होईल, अशी अपेक्षाही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.स्वागताप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, जिल्हा सचिव अभिजित शेंडे, जिल्हा सचिव सागर डेकाटे, भाजपा सोशल मीडिया संयोजक (अहेरी विधानसभा क्षेत्र) राकेश कोसरे, सागर बिट्टीवार, अजय ठाकरे, मल्लेश तोटावार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुष्पगुच्छ देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत चांदेवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अहेरी उपविभागात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कामगिरी करण्याचा विश्‍वास व्यक्त केला.