बंगालमधील तीन राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rajya sabha seats in bengal भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभा जागांच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. सुष्मिता देव, सुखेन्दु शेखर रॉय आणि प्रकाश चिक बाराईक यांनी राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष सोडला.
 
 
rajya sabha seats in bengal
 
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सुष्मिता देव यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०३०, तर सुखेन्दु शेखर रॉय आणि प्रकाश चिक बाराईक यांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट २०२९ रोजी संपणार होता. आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकानुसार निवडणुकीची अधिसूचना ७ जुलैला जारी केली जाईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १४ जुलै असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी दुसऱ्या दिवशी हाेईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख १७ जुलै असेल तर २४ जुलैला सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत मतदान होईल. निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल.