आर्वीत पोहोचले अखेर शुद्ध पाणी

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
आर्वी
clean-water शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे पाणी पुरवठा केल्या जातो. मागील काही दिवसांपासून शहराच्या काही भागातून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. २६ जून रोजी नगराध्यक्ष, उपाध्यक्षांनी मजीप्राचे जलशुद्धीकरण केंद्र गाठले. शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत संपूर्ण निरीक्षण करून अधिकारी कर्मचाऱ्यां सोबत  चर्चा केली. आ. सुमित वानखेडे यांनी गढुळ पाणी पुरवठ्याची दखल घेत अधिकार्यांची कान उघाडणी केल्यानंतर शहराला शुद्ध पाणी पुरवठा होऊ लागला आहे.
 
clean water
 
clean-water मजीप्राच्या वतीने शहरात सुरू असलेल्या रोड, नाली बांधकामामुळे जलवाहिनी फुटून लिकेज् होऊन त्यातून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व लिकेज् तात्काळ दुरुस्त करच्या सुचना मजीप्राच्या अधिकाऱ्याना दिल्या. त्यानंतरही गढूळ पाणीपुरवठा सुरू असल्याने ३ जुलै रोजी नगराध्यक्षांनी एका दिवसात जलशुद्धीकरणातील साचलेला गाळ काढून ते स्वच्छ करण्याच्या सुचना केल्या.
 
clean-water आमदार सुमित वानखेडे यांनीही बाबतीत पाठपुरावा करत अधिकार्यांची कान उघडणी केली. ४ जुलै रोजी स्वच्छ करण्यात आली असता जलशुद्धीकरणातील क्लारिफायर स्वच्छ केल्याचं गेले नसल्याचे पुढे आले. शहरातील नागरिकांना आता दिलासा मिळून स्वच्छ पाणीपुरवठा मिळणार आहे.