देवरंजनच्या उन्हाळी शिबिराचा समारोप उत्साहात

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Devaranjan Summer Camp देवरंजन बहुउद्देशीय संस्थेतर्फे महाल येथील हिंदू मुलींच्या शाळा सभागृहात आयोजित नाट्य व अभिनय उन्हाळी शिबिराचा समारोप उत्साहात झाला. यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी अशा शिबिरांमधून उद्याचे कलावंत घडत असल्याचे सांगत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
 
dev
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते मुकुंद वसुले आणि अभिनेत्री आसावरी तिडके उपस्थित होते.Devaranjan Summer Camp प्रमुख प्रशिक्षक चिन्मय देशकर यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरार्थींनी नृत्य, प्रहसने, 'राखेतून उडाला मोर' ही बालनाटिका तसेच 'कलाकारों की रामलीला' ही हिंदी विनोदी एकांकिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.यावेळी रंगभूमीवरील विविध कलाकारांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाप्ती देशकर यांनी, सूत्रसंचालन मो. सलीम शेख यांनी, तर आभार प्रदर्शन प्रवीण देशकर यांनी केले.
सौजन्य: डॉ. रवींद्र भुसारी,संपर्क मित्र