हृदय तपासणी शिबिर शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
गडचिरोली,
camp येथील महिला व बाल रुग्णालयात रविवारी आयोजित विशेष वैद्यकीय शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 300 हून अधिक बालकांची अत्याधुनिक 2-डी इको तंत्रज्ञानाद्वारे मोफत तपासणी करण्यात आली. दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 

camp  
जिल्ह्यातील बालकांना अत्याधुनिक हृदयरोग निदान व मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या भव्य बाल हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ड. आशिष जयस्वाल, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बालकांमध्ये जन्मजात हृदयविकारांचे निदान करून उपचार करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे कार्यक्रमादरम्यान सांगितले.
कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. सौरभ अग्रवाल, विजयकुमार शेटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, प्रशांत खोब्रागडे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आदी उपस्थित होते.
2 वर्षीय चिमुरडीला जीवदान
अहेरी तालुक्यातील दोन वर्षीय चिमुरडी अन्विका सुरज गौरकर हिची यशोगाथा सादर करण्यात आली. अंगणवाडी स्तरावरील नियमित आरोग्य तपासणीत तिच्या हृदयाला जन्मजात छिद्र असल्याचे निदान झाले. तिच्यावर मोफत शस्त्रक्रिया होईल, असे सांगितले.