मानोरा,
marathi textbook तालुयातील सोमठाणा या गावचे मूळ रहिवासी व सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ लेखक बाबूसिंग मोहनसिंग राठोड यांच्या साहित्याने मानोरा तालुयाचा मान राज्यभर उंचावला आहे. राज्य शासनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या इयत्ता सहावीच्या ‘शिकू मराठी आनंदाने’ या मराठीच्या पाठ्यपुस्तकात राठोड लिखित ‘भारताचे भाग्यविधाते’ या पुस्तकातील उतार्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तालुयातील प्रसिद्ध लेखकाच्या लेखणीतून साकार झालेल्या साहित्यकृतीचे वाचन करून राज्यभरातील विद्यार्थी घडणार आहेत.
पाठ्यपुस्तकाच्या पान क्र.६४ वर ‘थोरांची ओळख’ या पाठात बाबूसिंग राठोड (१९५४) यांचा उल्लेख ‘प्रसिद्ध लेखक’ असा करण्यात आला आहे. त्यांच्या ‘भारताचे भाग्यविधाते’ या पुस्तकातून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली आहे. ‘श्री समर्थ रामदास स्वामींचे श्लोक मनोबोध ओवीरूप दासबोध व करूणाष्टके’ हे राठोड यांचे आणखी एक प्रसिद्ध पुस्तक आहे, अशी नोंदही पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे.
बाबूसिंग मोहनसिंग राठोड हे मूळचे सोमठाणा, ता. मानोरा येथील. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लेखन-वाचनाला वाहून घेतले. बंजारा समाजाचा इतिहास, संत साहित्य व थोर व्यक्तींची चरित्रे यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ‘भारताचे भाग्यविधाते’ या पुस्तकात त्यांनी भारत घडवणार्या थोर महापुरुषांच्या कार्याचा वेध घेतला आहे. तालुयासाठी अभिमानास्पद ग्रामीण भागातील लेखकाच्या साहित्याला पाठ्यपुस्तकात स्थान मिळणे ही मानोरा तालुयासाठी अभिमानाची बाब आहे. बाबूसिंग राठोड यांच्या साध्या-सोप्या भाषेतील लेखनामुळे थोरांची ओळख विद्यार्थ्यांना सहज होणार आहे. भविष्यातील नागरिक घडवण्यात या पाठाचा मोलाचा वाटा असेल, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील शिक्षक मिथुन राठोड यांचे सह जाणकारांनी दिली.