गोंदिया
short circuit शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौकातील ‘वैभव कलेक्शन’ या रेडिमेड व कापडाच्या दुकानाला सोमवारी 6 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागून दुकानातील मोठ्या प्रमाणातील कापड व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
short circuit मुख्य बाजारपेठेतील तीन मजली इमारतीत ‘वैभव कलेक्शन’ हे कापड दुकान असून सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास दुकानातून अचानक दाट धूर बाहेर येऊ लागले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच संपूर्ण गल्ली धुराने व्यापल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानात मोठ्या प्रमाणात कापड व रेडिमेड वस्त्रांचा साठा असल्याने आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अshort circuit ग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत दुकानातील कापड, रेडिमेड वस्त्रे तसेच इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग लागण्याचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
short circuit मोठी दुर्घटना टळली....
गोरेलाल चौक परिसरात मोठ्या प्रमाणात कापड व इलेक्टॉनिक्सची दुकाने असून सर्वच दुकाने रांगेत व एकमेकांना चिकटून आहेत. सुदैवाने सदर घटना सकाळच्या सुमारास असल्याने परिसरातील व्यवसायीक व नागरिकांच्या तत्काळ लक्षात आली. त्यामुळे आगीवर वेळत नियंत्रण मिळवता आले व मोठी दुर्घटना टळली.