खा. संजय राऊत यांनी केलेला२० कोटी रुपयांचा दावा खोटा : आ. धिरज लिंगाडे

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
बुलढाणा
mla dhiraj lingade अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी २० कोटी रुपयांची ऑफर संदर्भात करण्यात आलेला दावा फेटाळून लावत खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक ऑफर आलेली नसून हे वक्तव्य खोटे असल्याचे तसेच निराधार विनाकारण बदनामी करण्याच्या दृष्टीने त्यांनी खोटा आरोप केल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
 
mla lingade
 
mla dhiraj lingade प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उबाठा नेते खासदार संजय राऊत यांनी आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांची फोडाफोड सुरू असून २० ते ५० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या जात असल्याचा आरोप केला होता. महाविकास आघाडीतील एका आमदाराला २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याची माहिती असून ते आमदार लिंगाडे असल्याचे सांगितले जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तसेच अशा प्रकारचे राजकारण थांबविण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
 
 
mla dhiraj lingade या पार्श्वभूमीवर पदवीधर आ. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना संजय राऊत यांच्या दाव्याचे खंडन केले. राऊत यांचे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले. मला कोणतीही ऑफर आलेली नाही. हे विधान पूर्णपणे खोटे असून ते राजकीय वक्तव्य म्हणून करण्यात आले असावे असे ते म्हणाले. मी यापूर्वी शिवसेनेत होतो आणि काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अमरावती पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो आहे. सध्या फोडाफोडीचे राजकारण दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू आहे. त्याचा इतर पक्षांशी कोणताही संबंध नाही. संजय राऊत यांची भेट झाल्यानंतर याबाबत त्यांनाच विचारणार आहे असेही आमदार लिंगाडे यांनी आर्वजून सांगितले.