देवळी,
sant lotangan maharaj dindi वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत गेल्या ७१ वर्षांपासून अखंड सुरू असलेली संत लोटांगण महाराज गौळ दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी आमदार राजेश बकाने यांनी दिंडीचे स्वागत करून वारकर्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संत लोटांगण महाराज संस्थेचे अध्यक्ष रामदासबापू पवार, निलेश कसणारे, नरेंद्र मदनकर, अमोल कसणारे, दीपक इंगळे, अशोक नागपुरे, संदीप लोणारे, महादेव दागाने, प्रकाश चांभारे, संतोष भोयर तसेच वारकरी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.भजन, टाळ-मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात दिंडीचे प्रस्थान झाले.