नागपूर,
Nagpur Municipal Corporation नागपूर महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, लांबच लांब रांगा, अपुरी माहिती आणि तासन्तास प्रतीक्षा यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रातील दुरुस्ती, विलंबित नोंदणी तसेच नवीन प्रमाणपत्रासाठी अनेकदा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अलीकडे नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे अर्जदारांची संख्या वाढल्याने विभागावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. Nagpur Municipal Corporation महानगरपालिकेने अधिक कर्मचारी नियुक्त करावेत, अतिरिक्त काउंटर सुरू करावेत, टोकन प्रणाली प्रभावीपणे राबवावी आणि ऑनलाइन सेवा अधिक सक्षम करून प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र