सेलूत झाडांमध्ये अडकल्या वीजतारा

महावितरणचा हलगर्जीपणा

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
सेलू,

power lines शहरातील घोराड रोड प्रभाग ३ मधील परिसरात रस्त्याजवळ झाडांच्या दाट फांद्यांमध्ये वीजतारा अडकून धोकादायक स्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
 

power lines  
झाडांमध्ये अडकलेल्या वीज तारांच्या समस्येबाबत महावितरण विभागाला अनेकवेळा तोंडी व लेखी सूचना देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून जोरदार वारे आणि पावसामुळे झाडांच्या फांद्याचे वीजतारांवर घर्षन सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरण विभागाला अनेकवेळा सूचना देऊनही अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. एखादी मोठी जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्यानंतरच महावितरणला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने झाडांच्या फांद्यांची छाटणी करून वीजतारा सुरक्षित कराव्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपा जिल्हा सचिव संजय जयस्वाल यांनी दिला आहे.