सहकारातूनच समृद्धी होऊ शकते : अॅड. कोठारी

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट
cooperation सहकारातुन समृद्ध म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने, सामुहिक प्रयत्नांनी आणि परस्पर विश्वासाने सर्वांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे होय. सहकारातूनच समृद्धी साधता येते, असे मार्गदर्शन कृउबाचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी केले.

hinganghat
 
cooperation सहकार सप्ताह निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व सहायक निबंधक सहकारी संस्थाच्या संयुक्त वतीने कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील शेतकरी निवासमध्ये जनजागृती सभेत ते बोलत होते. यावेळी सहायक निबंधक स्वप्नील पुराम, समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर, मधुकर डंभारे, प्रफुल बाडे, उत्तम भोयर, दिगांबर चांभारे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालीया, पंकज कोचर, अशोक उपासे, डॉ. निर्मेश कोठारी, घनश्याम येरलेकर, आदी उपस्थिती होती.
cooperation यावेळी सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी महाराष्ट्रात सहकारी चळवळीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बदल करणे शक्य झाले. ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातुन शेतकऱ्यना  वेळेवर अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा तसेच बी-बियाणे व खतं उपलब्ध करून देणे शक्य झाले. सहकाराचे संस्कार असणे व ते जोपासणे गरजेचे आहे. त्याच्यातुनच समृद्धीचा मार्ग मिळतो असे अॅड. कोठारी म्हणाले.
यावेळी बाजार समितीच्या आवारात सोनचाफा व बकुळ या प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच नांदगाव बोरगाव येथील जागेलगत असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर १०० वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला.
cooperation विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता सुसज्य अभ्यासिका उभारणीचा निर्णय घेण्यात आला.
अॅड. सुधीर कोठारी यांचा सत्कार करण्यात आला. संचालन शैलेश कोपुलवार यांनी तर आभार समितीचे सचिव तुकाराम चांभारे यांनी मानले.