बळीराजावर दुबार पेरणीचे संकट

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
सुरेशकुमार लाडे
मुल्ला
re-sowing देवरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने सततची हजेरी लावली त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असताना सततच्या पावसामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. अनेक शेतांमध्ये पेरलेले बियाणे पाण्याखाली जाऊन खराब झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
perani
 
re-sowing सलग पाच ते सहा दिवस झालेल्या पावसामुळे नद्या व नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी पाणी शेतात व गावांमध्ये शिरल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही प्रभावित झाली आहे. या परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असून शाळेत येणे-जाणे कठीण झाले आहे. काही गावांमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. पालकांकडून मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी-नाल्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
re-sowing आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शेतकर्‍यांनी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी केली आहे. एकीकडे पावसामुळे पाणी साठा वाढला असला तरी दुसरीकडे झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच, मुसळधार पावसामुळे देवरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.