जि.प. अध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांचा आढावा

तातडीने निवारणासाठी अधिकार्‍यांना सूचना

    दिनांक :06-Jul-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव
citizens-grievances गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी रविवारी 5 जुलै रोजी इंजोरी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक हिताच्या विविध समस्या जाणून घेत. त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सुचना दिल्या.
 
zp
 
citizens-grievances भेंडारकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्ते, वीज, शासकीय योजनांचा लाभ, महसूल, ग्रामविकास तसेच इतर स्थानिक समस्यांबाबत आपल्या अडचणी मांडल्या. भेंडारकर यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेत समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागातील अधिकार्‍यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. तसेच प्रकरणांचा तातडीने निपटारा करून नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रसंगी बोलताना लायकराम भेंडारकर म्हणाले की, जनतेच्या समस्या केवळ ऐकून घेणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य नाही, तर त्या प्रामाणिकपणे आणि वेळेत मार्गी लावणे ही आपली जबाबदारी आहे.
 
 
citizens-grievances प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा आणि त्यांची कामे विनाविलंब पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. जनसंपर्क कार्यालयात आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या तत्परतेने ऐकून घेत त्वरित संबंधित विभागाशी संपर्क साधल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे आभार व्यक्त केले.